Ad will apear here
Next
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे जीवन कौशल्य कार्यशाळा


रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे वरवडे येथील माध्यमिक विद्यालय, पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, मालगुंड येथील शिरीष मुरारी मयेकर विद्यालय, बळीराम परकर विद्यालय, चाफे येथील सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ विद्यालय येथे जीवन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सोनाली कदम आणि माणिक बाबर यांनी मार्गदर्शन केले.

मुलींना मार्गदर्शन करताना डॉ. कदम यांनी टीव्हीवर लागणाऱ्या मालिका आणि खरे आयुष्य यात अंतर असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘मनोरंजन म्हणून कार्यक्रम पाहणे वाईट नाही; परंतु सवय म्हणून मालिका पाहू नयेत. काहीतरी बोध मिळणारे कार्यक्रम जरूर पाहावेत. फेसबुकसारख्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होतो. आपण जे काम करतो त्यापासून पैसा मिळवण्यापेक्षा आत्मिक समाधान किती मिळेल हे महत्त्वाचे आहे. आपल्याला आयुष्यात काय व्हायचे आहे हे ठरवून त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.’

‘आपल्याला आत्मभान असेल, तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. आपण अभ्यास करताना वाचन करतो त्यावर विचार करून त्यावर व्यक्त झाले पाहिजे. स्वतःची काळजी आपण स्वतःचा घेऊ शकतो. योग्यवेळी नाही म्हणणे, घरातल्यांसोबत संवाद साधणे पुढच्या अडचणींना आळा बसवू शकतो,’ असा देताना डॉ. कदम यांनी मुलींना आत्मभान, संप्रेषण या कौशल्यांवर आधारित अनेक उदाहरणे देऊन प्रोत्साहन दिले.

बाबर यांनी मुलांचे समुपदेशन करताना लैंगिक, सामाजिक, भावनिक बदल, प्रेम, आकर्षण, मैत्री, लैंगिक समस्या व आजार, स्मार्टफोन आणि पालकांशी संवाद अशा अनेक विषयांवर मुलांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कुमार अवस्थेत आपल्या अस्तित्त्वाची दखल घ्यावी असे वाटत असते. हे वय म्हणजे मानसशास्त्राच्या भाषेतील तणाव व वादाचा काळ या अवस्थेतून सहीसलामत बाहेर पडलात, तर आयुष्य जगणे अवघड होऊन बसते. म्हणजेच नको असलेल्या चुका होणे, व्यसनांच्या आहारी जाणे आदी. यासाठी आपल्या पालकांशी संवाद साधने गरजेचे आहे.’

जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे युनिट हेड रवी चंदेर व सीएसआर प्रमुख सुधीर तैलंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक श्री. देशमुख, श्री. बंजोळे, विनायक राऊत, प्रमिला कुळ्ये, शाळेतील शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले. सई साळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना सौरभ पतयाने, सागर जोग व दर्शना रहाटे यांनी सहकार्य केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZYEBV
Similar Posts
‘जेएसडब्ल्यू’तर्फे जयगड येथे शिक्षकांसाठी शिबिर जयगड : येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडच्या सीएसआर विभागातर्फे मानस समुपदेशन, रत्नागिरीतील मानसोपचार व मूल्यमापन केंद्र आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षकांसाठी ‘वर्गाचे मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षकांची भूमिका’ हे दोन दिवसीय निवासी शिबिर घेण्यात आले.
‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिर रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडतर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एक डिसेंबर २०१८ रोजी ट्रक चालकांसाठी एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग (डीएपीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रक चालक व क्लीनर यांना मार्गदर्शन करण्यात आले
‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांची आरोग्य तपासणी रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेडतर्फे जिंदालच्या ट्रक पार्किंग विभागातील वाहन चालक व वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी त्यांचे व्यसन समुपदेशन, मौखिक कर्करोग व एचआयव्ही एड्स समुपदेशन करण्यात आले.
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे वैद्यकीय शिबिर जयगड : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट, रत्नागिरी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, जयगड ग्रुप ग्रामपंचायत व डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जयगड स्टेशन एमएमबी ऑफिसच्या प्रांगणात दोन दिवसीय भव्य वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ ३०० हून अधिक ग्रामस्थांनी घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language